|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवकांना घडविणारे लोकमान्य टेनिंग ऍकॅडमी

युवकांना घडविणारे लोकमान्य टेनिंग ऍकॅडमी 

प्रतिनिधी /बेळगाव :

लोकमान्य संस्थेच्या माध्यमातून बँकिंग, शिक्षण, पर्यटन, विमा, हॉटेल्स, रिसॉर्ट या उद्योगांप्रमाणेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. लोकमान्य समुहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी लोकमान्य संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देवून सामाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बेळगाव व परिसरातील युवकांना मिलिटरी संबंधित प्रशिक्षण मिळावे, यासाठी लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमी सुरु करण्यात आली. उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक परिपूर्ण मिलिटरी कोचिंग सेंटर म्हणून ऍकॅडमीने नावलौकिक मिळविले आहे.

‘सक्षम एवम प्रगती’ हे ब्रिदवाक्मय घेवून ही ऍकॅडमी मार्गक्रमण करीत आहे. भारतीय सेना, वायुसेना, नौदल, बीएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ याबरोबरच एसएसव्ही, ओटीए, एनडीए, सीडीएमई याचे स्पेशल कोचिंग ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये दिले जाते. लोकमान्यचे सीएमओ कर्नल दिपक कुमार गुरूंग यांच्याकडून प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन व टेनिंग देण्यात येते. शारिरीक व वैद्यकीय चाचणी करूनच ऍकॅडमीमध्ये प्रवेश दिला जातो. ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षाणार्थिंसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या ऍकॅडमीतून आजवर अनेक विद्यार्थी सैन्यदलात विविध पदांवर उत्तम कामगिरी बजावत आहेत. ज्या तरुणांना सैन्यदलात आपली स्वप्ने पूर्ण करावयाची आहेत. त्यांनी लोकमान्य टेनिंग ऍकॅडमी चन्नम्मानगर, वेदमंदिर येथे संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी 0831-2420120, 7022469544 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे टेनिंग ऍकॅडमीतर्फे कळविण्यात आले आहे.