|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरात काँग्रेसमध्ये तिकीटवाटपावरून वादंग

गुजरात काँग्रेसमध्ये तिकीटवाटपावरून वादंग 

अहमदाबाद / वृत्तसंस्था :

गुजरात काँग्रेसमध्ये तिकीटवाटपावरून मोठा वाद निर्माण झाल्याने पक्षश्रेष्ठींसाठी नवी डोकेदुखी निर्माण झाली. आता अखिल भारतीय काँग्रेस समिती म्हणजेच एआयसीसीने तेथील वाद संपुष्टात आणण्यासाठी एक पथक पाठविले. या पथकात 4 वरिष्ट नेत्यांचा समावेश असून नाराज पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय.

सुरत शहरात काँग्रेसला यश मिळविण्याची अपेक्षा दिसून येत होती, परंतु येथील तीन वरिष्ठ नेत्यांनी तिकीटवाटपावरून नाराज होत पक्षाला रामराम केला. या स्थितीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चिंता सतावू लागली आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंग सोलंकी यांनी अगोदरच निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचा प्रयत्न

-काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची कबुली दिली. नाराज कार्यकर्ते आणि नेत्यांची मनधरणी करत पक्षाला होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न पथकाकडून होत आहेत. 

-काँग्रेससाठी व्यावसायिकांचा गड सुरत सर्वात विशेष असून तेथेच पक्षाला गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पक्षातील 3 महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे उमेदवार अडचणीत आले आहेत.

-सुरतमधील स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्षशेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांचे एक पथक पाठविले. या पथकाला ‘फायर फायटिंग टीम’ संबोधिले जात आहे.

 

Related posts: