|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातमध्ये भाजपचाच विजय होणार : जितेंद्र सिंग

गुजरातमध्ये भाजपचाच विजय होणार : जितेंद्र सिंग 

गुजरात विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत एकीकडे काँग्रेस स्वतःच्या विजयाचा दावा करत आहे. तर कोणत्याही स्थितीत विजय आपलाच होईल असे भाजपचे म्हणणे आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कितीही जोर लावला तरीही त्याला लाभ होणार नाही असा दावा केला. राहुल गांधी आणि हार्दिक पटेल ‘क्लब’ देखील काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकणार नाही असे सिंग म्हणाले.

गुजरातची निवडणूक जसजशी जवळ येतेय, भाजपची स्थिती आणखीन बळकट होत चालली आहे. 18 तारखेला मोठय़ा बहुमतासह भाजप तेथे विजय मिळवेल. राहुल गांधींच्या गुजरातमधील प्रचारामुळे भाजपलाच लाभ होणार आहे. राहुल गांधींचा दृष्टीकोन आणि ते किती चांगले काम करू शकतात हे या निवडणुकीतून दिसून येईल असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस आणि हार्दिक पटेलच्या आघाडीचा भाजपवर कोणताही प्रभाव पडणार नाही. हार्दिक आणि काँग्रेसकडून जनतेचा अगोदरच अपेक्षाभंग झाला आहे. एक हरलेला खेळाडू दुसऱया पराभूत खेळाडूसोबत मिळून गुजरातच्या जनतेला योग्य दिशा दाखवू शकत नाही. दोघेही परस्परांना पकडून एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. 2017 चा गुजरात हा तरुणाईचा आहे. तेथील 70 टक्के नागरिक तरुण आहेत. सर्व तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असल्याचे वक्तव्य सिंग यांनी केले.

जीएसटीच्या मुद्यावरून गुजरातच्या व्यापाऱयांची समजूत काढण्यात आली आहे. जीएसटीवरून आता गुजरातचे व्यापारी विरोधात नाहीत. प्रारंभिक काळात गुजरातच्या व्यापाऱयांना काही शंका होत्या, ज्या दूर करण्यात आल्याचे सिंग म्हणाले.

Related posts: