|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश

सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश 

नवी दिल्ली :

सहाराच्या ऍम्बी व्हॅलीचा लिलाव सुनिश्चित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरला गुरुवारी दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश रंजन गोगोई आणि ए.के. सिकरी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

मुंबई उच्च न्यायायलाच्या अधिकृत अधिकाऱयाने रिसिव्हरची मदत घेत या मालमत्तेचा लिलाव निर्धारित करावा असे खंडपीठाने म्हटले. या कामासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निर्देश घ्यावेत असा आदेश खंडपीठाने अधिकाऱयाला दिला.

सहारा समूहाने 9 हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी न्यायालयाकडे 18 महिन्यांची मुदत मागितली होती. सहाराला 24 हजार कोटी रुपये न्यायालयात जमा करावे लागणार आहेत. या रकमेच्या हिस्स्याच्या रुपात 9 हजार कोटी रुपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली. ऍम्बी व्हॅलीच्या लिलावात अडथळा आणण्याचा प्रयत्न अवमान मानला जाईल आणि तसे करणाऱयाला तुरुंगात पाठविले जाईल असे न्यायालयाने म्हटले होते.

 

 

 

Related posts: