|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवराज, हिंदुस्तान क्रिकेट, भुवन इलेव्हन विजयी

युवराज, हिंदुस्तान क्रिकेट, भुवन इलेव्हन विजयी 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

साईराज बिल्डर्स पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित चौथ्या साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी टिळकवाडीतील व्हॅक्सिनडेपो मैदानावर युवराज स्पोर्ट्स क्लब, हिंदुस्तान क्रिकेट क्लब कुडची, भुवन इलेव्हन बैलहेंगल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला.

गुरूवारी झालेल्या विविध सामन्यात किसन सिजलींग, सोयल, सादीक तिगडी यांना प्रमुख पाहुणे राजेश जाधव, महेश फगरे, जॅकी मॅस्करनेस, लक्ष्मण धामणेकर यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक

युवराज स्पोर्टस् क्लब : 11 षटकात 5 बाद 73 धावा विजयी वि. एवायसी इलेव्हन : 11 षटकात सर्वबाद 69 धावा.

इंडियन बॉईज यमकनमर्डी : 10 षटकात सर्व बाद 32 धावा पराभूत वि. हिंदुस्तान क्रिकेट क्लब कुडची : 4.4 षटकात 2 बाद 34 धावा.

भुवन इलेव्हन बैलहोंगल : 12 षटकात 8 बाद 71 धावा विजयी वि. रोहित स्पोर्टस् : 11 षटकात सर्वबाद 49 धावा.

आजचे सामने :

सकाळी 9 वा. ए-वन-पॅकर्स निपाणी वि. अलरजा बेळगाव.

सकाळी 11 वाजता हिंदुस्तान क्रिकेट क्लब कुडची वि. युवराज स्पोर्ट्स.

दुपारी 1 वा. युवराज एकता स्पोर्टस् वि. साईराज वॉरियर्स