|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूरात खासगी बसला आग ,दोन प्रवाशांचा मृत्यू

कोल्हापूरात खासगी बसला आग ,दोन प्रवाशांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कोल्हापूरात आत्माराम ट्रव्हल्सच्या बसला आग लागली आहे, या घटनेत दोन प्रवशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे,तर 16 प्रवाशांना बचावण्यात यश आले.

गगनबावडा मार्गावरील लोंघेगावच्या हद्दीत पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रव्हल्स ही बस गोव्यावरून कोल्हापूर – पुणे मार्गे मुंबईला निघाली होती. एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसला भीषण आग लागली आणि काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी बसमध्ये दोन प्रवासी 90 टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.दोन्ही मृत प्रवासु पुण्याचे आहेत. बंटी भट आाrण विकी भट अशी त्यांची नावे आहेत.

Related posts: