|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » 15 डिसेंबरपासून संसदेत हिवाळी अधिवेशन

15 डिसेंबरपासून संसदेत हिवाळी अधिवेशन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

येत्या 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. गुजरातच्या दोन्ही टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्याने गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू होते. अमित शहा यांचा पुत्र जय शाह यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, जीएसटीच्या अंमलबजावणीतले घोळ या विषयावरून विरोधक हिवाळी अधिवेशनात गदरोळ करण्याची शक्यता होती. अधिवेशनातल्या विषयांची मीडियातही हेडलाईन होत असल्याने सरकारला गुजरातच्या रणधुमाळीत हा धोका पत्करायचा नव्हता असा आरोप होत आहे. अर्थात सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

 

Related posts: