|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » डीएसके फसवणार नाही,त्यांना संपवण्याचा षडयंत्र : राज ठाकरे

डीएसके फसवणार नाही,त्यांना संपवण्याचा षडयंत्र : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम /  पुणे   :                    

बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी ही फसवणारी व्यक्ती नसून काही राजकीय आणि अमराठी मंडळींनी षडयंत्र करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.या बैठकीत राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्याशी पाठीशी उभे राहा,असे आवाहन गुंतवणूकदारांना केले. डीएसके अर्थिक अडचणीत सापडले आहेत,मात्र,ते फसवणूक करणाऱयांपैकी नाहीत,असे राज ठाकरे म्हणाले.मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

 

Related posts: