|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » सलग सातव्या सत्रात तेजी कायम

सलग सातव्या सत्रात तेजी कायम 

मुंबई / वृत्तसंस्था :

बाजारात सलग सातव्या सत्रात तेजी दिसून आली. सेंसेक्स आणि निफ्टी 0.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला. दिवसातील तेजी दरम्यान निफ्टी 10,400 पर्यंत वधारला होता, सेन्सेक्स 33,738 पर्यंत पोहोचला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 91 अंशाने मजबूत होत 33,679 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 41 अंशाच्या तेजीने 10,390 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीच्या मिडकॅप 100 निर्देशांकाने उच्चांकाचा विक्रम स्थापित केला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला, तर बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

औषध, एफएमसीजी, आयटी, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, पॉवर, तेल आणि वायू समभागात चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी 0.15 टक्क्यांनी वधारत 25,780 वर बंद झाला. निफ्टीचा औषध निर्देशांक 0.8 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.75 टक्के, आयटी निर्देशांक 0.7 टक्के, वाहन निर्देशांक 0.4 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 2.8 टक्के, ऊर्जा निर्देशांक 0.6 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारत बंद झाले.

धातू आणि पीएसयू बँक समभागात मात्र विक्री दिसून आली. निफ्टीचा धातू निर्देशांक 0.6 टक्के, पीएसयू बँक 0.6 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

अरबिंदो फार्मा, इन्डसइंड बँक, इन्फोसिस, गेल, भारती एन्फ्राटेल, बजाज ऑटो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, कोटक बँक, आयटीसी 3-0.9 टक्क्यांनी वधारले. हिंडाल्को, वेदान्ता, टाटा मोटर्स डीव्हीआर, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, यूपीएल, अदानी पोर्ट्स, हीरो मोटो 1.4-0.6 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात सीजी कंझ्युमर, अशोल लेलँड, आदित्य बिर्ला फॅशन, पिरामल इन्टरप्रायजेस, हॅवेल्स इंडिया 6.1-2.5 टक्क्यांनी मजबूत झाले. ओबेरॉय रिअल्टी, जीई टी ऍण्ड टी इंडिया, जिलेट इंडिया, एल ऍण्ड टी फायनान्स, ब्लू डार्ट 4-1.2 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात कॅमलिन फाईन, जय कॉर्प, रॉयल ऑर्किड, बालाजी टेलीफिल्म, प्राज इन्डस्ट्रीज 19.6-10.6 टक्क्यांनी वधारले. न्यूलँड लॅब, आर्शिया, टीमलीज, एचईजी, व्ही. बी. इन्डस्ट्रीज 8.5-5 टक्क्यांनी घसरले.

Related posts: