|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धैर्यशील पाटील यांची निवड

धैर्यशील पाटील यांची निवड 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी धैर्यशील पाटील यांची फेरनिवड झाली. नाशिक येथे झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत पाटील यांनी विरोधी उमेदवार कृष्णा लोकमानवार यांच्यावर 16 मतांनी विजय मिळविला. त्याचबरोबर सेक्रेटरी पदी नाशिकचे प्रफुल्ल जैन, ऑर्गनायझींग सेक्रेटरी श्यामसुंदर शर्मा, खजानिस म्हणून अतुल दोशी यांची निवड झाली. तसेच पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी अनुक्रमे अमोल मेहता, मधुकर गायकवाड, चंद्रेश पालन, रामकृष्ण चक्रवार यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परेश पटेल, राम अग्रवाल, नरेंद्र पाटील, विजय नारायणपुरे यांनी काम पाहिले. 

 

 

 

 

Related posts: