|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले

चिंचवडे तर्फ कळेच्या उपसरपंचपदी सिंधुताई कोले 

वार्ताहर /कळे :

चिंचवडे तर्फ कळेच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी सौ. सिंधुताई कोले यांची निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज कांबळे होते.

चिंचवडे तर्फ कळेच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शाहू आघाडीला पाच जागा तर विरोधी शिवशंभो आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या. गावच्या थेट सरपंचपदी अपक्ष युवराज कांबळे विजयी झाले होते. उपसरपंच निवडणुकीत सिंधुताई कोले व युवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात सिंधुताई कोले यांना पाच तर युवराज पाटील यांना चार मते मिळाली. त्यामुळे सिंधुताई कोले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सुतार, रेखा कांबळे, निशा गुरव, शिवाजी कांबळे, पिंटू कदम, निता पाटील, हौसाबाई कदम उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत ग्रामसेविका रोहिणी हावळ यांनी तर आभार युवराज पाटील यांनी मानले.