|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हलकर्णी येथे कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबीर

हलकर्णी येथे कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबीर 

प्रतिनिधी /चंदगड :

हलकर्णी येथे विधी सेवा समिती मार्फत कायदेविषयक सहाय्य व सल्ला समिती शिबीर न्यायाधीश एम. डी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

न्यायधीश एम. डी. ठोंबरे यांनी कायदा हा सर्वांसाठी समान आहे, असे सांगितले. स्वागत सरपंच एकनाथ कांबळे यांनी करून गावातील पानंद रस्ते, पाय वाटा अतिक्रमनातून मुक्त करण्यासाठी महसूल खात्याकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी केली. यावेळी सह. दिवाणी न्यायाधीश डी. एम. गायकवाड, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, नायब तहसीलदार आर. टी. झाजरी, कोवाडचे पोलीस उपनिरीक्षक श्री. वाघ, संरक्षण अधिकारी डी. डी. कवडे, ऍड. गावडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सोमानाथ गवस, सौ. एम. एम. आमणगी, उपसरपंच गोविंद आवडण, शिवाजी नाईक, सुरेश भातकांडे, सुरेश केसरकर, गीता जाधव, सविता नाईक, प्रतिक्षा सावंत, कांचन सुतार, रेणुका नाईक, लता भोगण, भरमाण्णा गावडे, शिवाजी सावंत उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटुरे यांनी मानले.

Related posts: