|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी तालुक्यात तब्बल 305 कातळशिल्पे!

रत्नागिरी तालुक्यात तब्बल 305 कातळशिल्पे! 

सर्वेक्षणाचे काम पूर्ण

19 गावात शिल्प ठिकाणे, 30 जागांची शिल्प नोंद

महसूल, पुरातत्व खात्याकडून मोहीम

प्रतिनिधी /रत्नागिरी

कातळशिल्प संरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या प्राथमिक प्रयत्नांचा भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यात महसूल आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱयांनी सर्वेक्षण पूर्ण केले. 19 गावांमधील 30 ठिकाणी 305 शिल्प रचना असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आहे.

रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, कातळशिल्पांचे अभ्यासक सुधीर रिसबुड, पुरातत्व अधिकारी ऋत्विज आपटे यांनी सर्वेक्षणाच्या कामी विशेष उत्सुकता दाखवून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. या सर्वेक्षणानंतर पुरातत्व खाते अधिसूचना जारी करुन ही कातळशिल्पे संरक्षित असल्याचे जाहीर करणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारशाचा समृद्ध ठेवा पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवला जाउढ शकेल. रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भगवतीनगर-रामरोड, चवे, देऊड, परचुरी, उक्षी, जांभरुण, निवळीफाटा, निवळी-गावडेवाडी, कापडगाव, उंबरे, कोळंबे, गावखडी, मेर्वी, करबुडे, मासेबाव, गोळप, गणेशगुळे, कुरतडे, चिंद्रवली, वेतोशी या गावांमध्ये कातळशिल्पे असून त्याचे सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्याचे सुधीर रिसबुड यांनी सांगितले.

कातळशिल्पांचा 15 हजार वर्षांपूर्वीचा हा ठेवा कायदेशीर संरक्षित होण्यासाठी हा प्रयत्न आहे. यामुळे देशी व विदेशी पर्यटकांना आकर्षित अशी †िठकाणे तयार होणार असून कातळशिल्पांच्या आसपास पर्यटन व्यवसाय वाढू शकेल, अशी खात्री असल्याची भावना रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी व्यक्त केली.

Related posts: