|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटय़ा पडला विहिरीत

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटय़ा पडला विहिरीत 

लांजातील मठ-बंडबेवाडीमधील घटना

साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाने केले बिबटय़ाला जेरबंद

प्रतिनिधी /लांजा

रात्रीच्यावेळी भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबटय़ा घराशेजारील 50 फुट खोल विहिरीत पडल्याची घटना लांजा तालुक्यातील मठ-बंडबेवाडी येथे बुधवारी रात्री 9़ 30 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आल़ी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वनविभागाच्या अधिकाऱयांनी साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबटय़ाला सुखरुप बाहेर काढत पिंजऱयात जेरबंद केले.

तालुक्यातील मठ बंडबेवाडी येथील प्रकाश बाळकृष्ण बंडबे यांच्या घराशेजारी व भरवस्तीत असणाऱया 50 फुट खोल उंच व 10 फुट पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबटय़ा पडल़ा रात्रीच्यावेळी बिबटय़ा भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनखात्याने वर्तवला आह़े घराच्या अवघ्या 10 फुटावर विहीर असल्याने प्रकाश बंडबेंना बुधवारी रात्री 9़30 वा.च्या दरम्यान विहिरीच्या दिशेने कोणत्या तरी प्राण्याचा ओsरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहणी केल़ी मात्र रात्रीची वेळ असल्याने विहिरीमधील काहीही दिसत नव्हत़े बॅटरीच्या सहाय्याने पाहिले असता विहिरीत बिबटय़ा पडला असल्याचे निदर्शनास आल़े या घटनेची खबर बंडबे यांनी त्वरित लांजाचे वनपाल व्ही. वाय़ गुरवळ यांना दूरध्वनीवरुन †िदल़ी बिबटय़ा विहिरीत पडल्याची खबर मिळताच वनविभाग लांजा व रत्नागिरी परिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मठ बंडबेवाडीत अर्ध्या तासात दाखल झाल़े अंधार असल्याने विहिरीतील बिबटय़ाला बाहेर काढणे कठीण झाले हेत़े त्यानंतर विहिरीत रस्सींच्या सहाय्याने पिंजरा सोडण्यात आल़ा मध्यरात्री 12़ 30 वाजता साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबटय़ाला सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आल़े यावेळी बिबटय़ाला विहिरीबाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभल़े

यानंतर वनविभागाकडून बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी करण्यात आल़ी बिबटय़ा साडेतीन वर्ष वयाचा मादी जातीचा होत़ा वनविभागाने बिबटय़ाला पहाटे 5़ 30 वाजता आंबा घाट येथील वनअधिवासात सोडून दिल़े बिबटय़ाला विहिरीबाहेर काढण्यासाठी परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरीचे बी. आर पाटील, लांजाचे वनपाल व्ही. वाय़ गुरवळ, वनरक्षक व्ही. ड़ी कुंभार, आर ब़ी गुंठे, न्हानू गावडे, परमेश्वर डोईफोडे, मठ पोलीस पाटील, सागर वायंगणकर व स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतल़ी

Related posts: