|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरकारचे खोटे गोडवे गाणार नाही

सरकारचे खोटे गोडवे गाणार नाही 

गडहिंग्लज / नेसरी :

शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत गोरगरीब शेतकऱयांना सरकार फसवत आहे. छ. शिवाजी महाराजांसारख्या दैवतांची नावे घेऊन फसवत आहे, असा राज्य सरकारवर हल्ला चढवत जनता ही दैवत आहे. त्यांना लाभार्थी ठरवत तुम्ही उपकार करत नाही. हे तुमचे कामच आहे. त्यासाठीच तुम्हाला निवडून दिले आहे. चुकले तिथे चुकले असे म्हणण्याचे धाडस राखले असून सरकारचे खोटे गोडवे गाणार नाही, असे स्पष्टीकरण नेसरीच्या शेतकरी संवाद मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संवाद मेळाव्यात पहिला मेळावा शुक्रवारी दुपारी नेसरी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार गजानन किर्तीकर, खासदार विनायक राऊत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार सुनिल शिंदे, आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. सुरूवातीस छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला वंदन पक्षप्रमुख ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला श्री. ठाकरे यांनी केला. सरकारची धोरणे, शेतकऱयांची कर्जमाफी यावर भाष्य करत सरकारकडून प्रश्न सुटत नसतील तर हे सरकार करायचेच काय ? असे सांगत जनतेने तुम्हाला सत्तेत बसविले. तुम्ही लाभार्थी आहात. पण जनतेला सेवा दिल्यानंतर तुम्ही त्यांना लाभार्थी कसे ठरविता, त्यांचे फोटो कसे छापता ? असा आरोप केला.

Related posts: