|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » एटीएम मशीनला लागलेल्या आगीत पैसे जळून खाक

एटीएम मशीनला लागलेल्या आगीत पैसे जळून खाक 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुण्यात एटीएम मशीनला लागल्या आगीत एटीएममधील पैसे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सहकारनगर भागातील जनता सहकारी बँकेच्या एटीएम मशीनला शनिवारी सकाळी आग लागली. या घटनेत सर्व पैसे जळून खाक झाले आहेत.

दरम्यान,ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आग्निशामन विभागाकडून व्यक्त करण्यात आली. अग्निशामन विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएममध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आग सर्वत्र पसरल्याने संपूर्ण एटीएम या आगीत जळून खाक झाले.त्यामुळे या एटीएममधील सर्व नोटाही आगीत भस्मसात झाल्या आहेत.

 

Related posts: