|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डेरवण येथे आर्चरी स्पर्धेत खेळाडूच्या हातात घुसला बाण

डेरवण येथे आर्चरी स्पर्धेत खेळाडूच्या हातात घुसला बाण 

राज्यस्तरीय स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी घडली घटना, 27 जिल्हय़ातून 500 खेळाडूंचा सहभाग

वार्ताहर /सावर्डे

महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यमाने सबज्यु†िनअर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सरावादरम्यान बाण लागून पुणे येथील विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

डेरवण क्रीडा संकुलावर, झोरेज स्पोर्ट्स अकादमी रत्नागिरी यांच्या सहकार्याने 16 वी सबजुनिअर (मुले, मुली) राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरून जातांना पुण्याची नॅशनल खेळाडू तेरा वर्षीय जुई ढगे हिच्या हातात तो आरपार घुसून ती जखमी झाली. त्यानंतर तिच्यावर डेरवण वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार चालू आहेत. दरम्यान, राज्य आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्याकडून माहिती घेतली असता स्पर्धा चालू असतांना मैदानाच्या बाहेरून जातांना हा प्रकार घडला असल्याचे सांगितले.

दरम्यान, या स्पर्धेसाठी राज्यभरातील मुबई, पुणे, नांदेड, ठाणे, नाशिक आदी 27 जिह्यातून 500 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतीय पद्धतीचा फिटा, परदेशी इटालियन व कंपाऊंड अशा तीन क्रीडा प्रकारात घेण्यात येणार आहे. विजेत्या चार खेळाडू राज्याचे नेतृत्व करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता संजय झोरे यांच्याहस्ते उद्घाटन करून स्पर्धेस सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजता डेरवण ट्रस्टचे विश्वस्त विकास वालावलकर यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, मधुकर क्षीरसागर, सुरेश दळवी यांच्या व संजय झोरे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले. या तिन्ही खेळ प्रकारात महाराष्ट्र संघ निवडण्यात येणार आहे.

Related posts: