|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी

अर्जेन्टिनाचा मेस्सी ‘गोल्डन शू’चा मानकरी 

वृत्तसंस्था /बार्सिलोना :

अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी चौथ्यांदा ‘गोल्डन शू’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. युरोपमध्ये झालेल्या विविध लीग फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक गोल गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामामध्ये नोंदविले आहेत.

बार्सिलोना संघाकडून आघाडीफळीत खेळणाऱया मेस्सीने हा जागतिक दर्जाचा पुरस्कार चौथ्यांदा पटकाविला आहे. या पुरस्कारासाठी मेस्सी आणि रियल माद्रीद संघातून खेळणारा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात चुरस होती. स्पॅनिश लीग स्पर्धेत मेस्सीने 37 गोल नोंदविताना हॉलंडच्या बॅस डोस्टने मागे टाकले. डोस्टने पोर्तुगीज लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग लिस्बन संघाकडून खेळताना 34 गोल केले आहेत. 30 वर्षीय मेस्सीने युरोपमधील लीग स्पर्धेत 2009-10 साली 34 गोल, 2011-12 साली 50 गोल तर 2012-13 साली 46 गोल नोंदविले आहेत.

बार्सिलोनामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात बार्सिलोना संघातील लुईस सुवारेझच्या हस्ते मेस्सीला गोल्डन शूचा पुरस्कार देण्यात आला. सुवारेझने 2015-16 साली गोल्डन शू चा पुरस्कार मिळविला होता. युरोपियन स्पोर्टस् मिडिया आणि युरोपियन स्पोर्टस् न्यूजपेपर व मॅक्झिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.

Related posts: