|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » विराट कोहलीचे तूफानी द्विशतक

विराट कोहलीचे तूफानी द्विशतक 

ऑनलाईन टीम / नागपूर :

विराट कोहलीने कारकीर्दीतले पाचवे द्विशतक झळकावून, नागपूर कसोटीवर टीम इंडियाची पकड आणखी घट्ट केली आहे. विराट कोहलीचा हे यंदाच्या मोसमातलं दुसरs कसोटी द्विशतक ठरले. त्याने 259 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह या द्विशतकाला गवसणी घातली. 213 धावांवर तो बाद झाला.

विराटने रोहित शर्माच्या साथीने पाचव्या विकेटसाठी दीडशेहून अधिक धावांची अभेद्य भागीदारी रचली. रोहित शर्माही कसोटी शतकाच्या दिशेने कूच करत आहे. या कसोटीत टीम इंडियाने चहापानानंतर चार बाद 570 धावांची मजल मारली. त्यामुळे भारताच्या हाताशी साडे तीनशेहून अधिक धावांची आघाडी झाली आहे.कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने मोठी मजल मारली. उपहारापर्यंत चेतेश्वर पुजारा 143 आणि विराट कोहली 124 धावांवर खेळत होते.

 

 

 

Related posts: