|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » सोनू, श्रेया आणि अमितराज देवामधून प्रथमच एकत्र

सोनू, श्रेया आणि अमितराज देवामधून प्रथमच एकत्र 

‘देवा’ या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्पिंग साईटवर रोज रोज नव्याने हे गाणे लाँच झाले. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या गाण्यामुळे शिगेला पोहोचली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित देवा सिनेमातील या रोमॅण्टीक गाण्याला सोनु निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज लाभला आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. विशेष म्हणजे, रोज रोज नव्याने या गाण्यांमार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही संगीतविश्वातील जोडी प्रथमच ‘देवा’ या सिनेमातून एकत्र आली आहे.

प्रेमीयुगुलांना पर्वणी ठरत असलेले हे गाणे, श्रेयालादेखील पसंत असून, हे गाणे माझे फेव्हरेट साँग असल्याचे ती सांगते. प्रसिद्ध कॉरियोग्राफर प्रभुदेवा यांच्या ट्वीटद्वारे एन्थम साँग लाँच करण्यात आले. नफत्यदिग्दर्शनात श्देवाश् असणाऱया प्रभूदेवाने देवाचे हे एन्थम सॉंग आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत देवाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अजय गोगावले याचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित देवा हे अतरंगी पात्र अंकुश चौधरीने साकारले असून, विविध रंगांनी नटलेल्या या गाण्यात प्रेक्षकदेखील रंगून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

या सिनेमामधून मराठीची ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रथमच एका नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. ज्यात ती लेखिकेच्या भूमिकेत दिसून येते. या सिनेमाच्या टीझरमध्ये, तिने साकारलेल्या माया या व्यक्तिरेखेच्या नजरेतून देवाचा शोधप्रवास आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय अतरंगी देवाच्या रंगबेरंगी छटा या ट्रेलरमध्ये दिसून येत असून, डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील पाहायला मिळत आहेत.

Related posts: