|Thursday, December 13, 2018
You are here: Home » मनोरंजन » दशक्रिया जगभरात प्रदर्शित होणार

दशक्रिया जगभरात प्रदर्शित होणार 

रंगनील क्रिएशन्स निर्मित 3 राष्ट्रीय आणि 11 राज्य पारितोषिक विजेत्या ‘दशक्रिया’ या बहुचर्चित लोकप्रिय चित्रपटाने महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगफहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर हाउस फुल कलेक्शन करीत सुपरहिटचा मान पटकावला आहे. मराठी चित्रपट व्यवसायातील नवनिर्मितीला चालना देत बॉक्स ऑफिसवर कमाल केलेला हा चित्रपट या क्षेत्रात पहिल्यांदा निर्मिती करणाऱया निर्मिती संस्थांसाठी प्रेरणादायी ठरला असून, या वर्षअखेरीस तिकीट बारीवर आपली कमाल दाखवीत मराठी चित्रपटसफष्टीतील मरगळ झटकून काढली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटउद्योगविश्वाला नवी संजीवनी मिळाली असून दर्जेदार निर्मिती करणाऱया कलावंतांचे मनोबल वाढले आहे. दुसऱया आठवडय़ात दशक्रियाची यशस्वी घोडदौड दुप्पट वेगात सुरू आहे. लवकरच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

रंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया 17 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु वेगवेगळय़ा वादविवादांमुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे काही ठिकाणीचे खेळ पहिल्या दिवशी शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. दशक्रियाचे दुसऱया आठवडय़ात पदार्पण झाले असून संपर्ण महाराष्ट्रात दररोज 200 हून अधिक चित्रपटगफहांमध्ये हा चित्रपट सुरू आहे. सर्वत्र चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत होत असून दशक्रियाला आता कुठेही विरोध होत नाही. दुसऱया आठवडय़ात दशक्रियाचे 7 दिवसांत एकूण जवळपास 2500 हून अधिक खेळ होणार आहेत. या चित्रपटासाठी सर्व माध्यमांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून काही वेगळ, प्रयोगशील आणि दर्जेदार देणाऱयांसाठी आशादायी असल्याचे या चित्रपटाचे पटकथा, संवाद, गीत, प्रस्तूतीकार प्रयोगशील साहित्यिक-कवी संजय कृष्णाजी पाटील, निर्मात्या कल्पना विलास कोठारी, कथाकार बाबा भांड, दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील आहेत.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, तसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासह जवळपास 150 नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली.

Related posts: