|Thursday, November 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण

सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण 

आजवर नेहमीच आगळय़ा वेगळय़ा प्रयोगांच्या मालिकेत सागरिका म्युझिकने भर दिली आहे. सागरिका म्युझिक आता लवकरच ‘चंदना’ ही मराठी शॉर्टफिल्म आपल्या भेटीस घेऊन येत असून म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनानंतर सागरिका म्युझिकच्या सागरिका दास यांनी आता शॉर्टफिल्मच्या माध्यमातून चित्रपट दिदर्शनातही पदार्पण केले आहे.

‘चंदना’ या शॉर्टफिल्मचे कथानक हे दोन गाण्यांभोवती गुंफण्यात आले असून लगबग चालली… या गाण्याचा व्हिडीओ नुकताच सोशल साईट्सवर प्रदर्शित केला आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही लग्न हा स्त्राrच्या आयुष्यातील महत्वाचा भाग समजला जातो आणि त्याचा स्त्राrच्या शिक्षणावर परिणाम होतो. यातूनच समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीचा आपल्याला अनुभव येतो. नेमका अनोख्या पद्धतीने या गाण्यात हा विषय मांडण्यात आला आहे. संगीता बर्वे लिखित या दोन्ही गाण्यांसाठी नव्या दमाच्या संगीतकार सुहित अभ्यंकर, गायिका राजेश्वरी पवार आणि गायक ओमकारस्वरूप बागडे यांनी आजकालच्या आयटम साँग्सच्या जमान्यात फीलगुड गाणी तयार केली असून स्त्राr शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाला महत्व दिले हे खरंच कौतुकास्पद आहे. याच गोष्टीमुळे सागरिका म्युझिकने यावर शॉर्टफिल्म तयार करण्याचा आणि ती दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चंदना या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अश्विनी गिरी, मीरा जोशी आणि सुखदा बोरकर यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळणार आहे.

Related posts: