|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळात ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची शानदार प्रारंभ

कुडाळात ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची शानदार प्रारंभ 

प्रतिनिधी / कुडाळ:

‘ग्रंथोत्सव-2017’ च्या सुरुवातीस येथील पाटणकर वाचनालयाकडून ग्रंथदिंडी ग्रंथोत्सव ठिकाणी ‘वाचाल तर वाचाल’, अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषेत वाजत-गाजत नेण्यात आली. ग्रंथदिंडीचा शुभारंभ विजया वामन पाटणकर ग्रंथालय येथे सहाय्यक ग्रंथालय संचालक (मुंबई विभाग) शालिनी इंगोले यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने करण्यात आला.

आमदार वैभव नाईक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, प्रतिभा पाटणकर, विठ्ठल कदम, जिल्हा गंथालय संघाचे कार्यवाह मंगेश मसके, नगरसेवक उषा आठल्ये, विठ्ठल पाटणकर, आप्पा भोगटे, अरविंद शिरसाट, राजन पांचाळ, राजन खोत, दीपाली काजरेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रंथदिंडीत सहभाग होता. 

ग्रंथदिंडी पाटणकर वाचनालयाकडून पानबाजारातून ग्रंथोत्सव ठिकाणी महालक्ष्मी सभागृह येथे नेण्यात आली. यात बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ हायस्कूल व पडतेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविताना ग्रंथांचेही महत्व पटवून दिले. 

Related posts: