|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारताची सलामी इंग्लंडशी

विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारताची सलामी इंग्लंडशी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2018 साली लंडनमध्ये होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना यजमान इंग्लंड बरोबर होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारताचा ब गटात सहभाग असून इंग्लंड, अमेरिका आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील 16 देशांचे महिला हॉकी संघ भाग घेत आहेत. जागतिक महिला हॉकी मानांकनात सध्या भारतीय संघ दहाव्या स्थानावर आहे. भारतीय महिला हॉकी संघाने अलिकडे आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेत यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील सलामीचा सामना 21 जुलैला खेळविला जाईल. त्यानंतर भारताचा या गटातील दुसरा सामना 26 जुलैला आयर्लंड विरूद्ध तर तिसरा सामना 29 जुलैला अमेरिकाविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात विद्यमान विश्वविजेता हॉलंड, चीन, कोरिया, इटली, क गटात अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, दक्षिण आफ्रिका, ड गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.

 

Related posts: