|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्युत खांबाला धडकून निट्टूरमध्ये उसाने भरलेले ट्रक्टर घरात घुसले

विद्युत खांबाला धडकून निट्टूरमध्ये उसाने भरलेले ट्रक्टर घरात घुसले 

वार्ताहर/ कोवाड

निट्टूर येथे हेमरस साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे भरधाव ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबला धडक देऊन घरात घुसले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन घरांचे, दोन विद्युत पोलचे आणि ट्रक्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जेवण आटोपून झोपायच्या तयारीत असलेल्या पाटील कुटुंबिय ट्रक्टर घरात पाहून भितीने पुरतं हादरून गेलं. रात्रभर ट्रक्टर पाटलांच्या घरी मुक्कामी राहिला. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास निट्टूर गावच्या प्रवेशद्वाराजवळील उताराला उसाने भरलेल्या ट्रक्टचा गीअर अचानक सटकला. गीअर सटकल्यानमुळे ट्रक्टर न्यूटरल झाले. त्यामुळे ट्रक्टर चालकाला उसाने भरलेलं वाहन केवळ ब्रेकवर कंट्रोल करणे अवघड झाले. उताराला ट्रक्टरचा वेग पाहता पुढील धोका ओळखून ट्रक्टर चालकाने काही क्षणातच चालत्या ट्रक्टरमधून उडी घेतली आणि आपला जीव वाचविला. दरम्यान उताराला वेगाने सुटलेले उसाने भरलेलं ट्रक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भरमाण्णा दत्तात्रय पाटील यांच्या घरातच थेट घुसले. उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली कुमाणा रामचंद्र पाटील यांच्या भिंतीवर आदळल्या. यावेळी मोठा आवाज आल्याने झोपेच्या तयारीत असलेली पाटील कुटुंबिय भितीने हवालदिल झाले. भरमाण्णा पाटील यांच्या खोलीचे मोठे नुकसान झाले आहे. चौकट, दरवाजे मोडले आहेत. गच्चीवरील स्लॅबचेही नुकसान झाले आहे. कुमाणा पाटील यांच्याही भिंतीचे गॅलरीचे नुकसान झाले आहे. विजय पाटील यांच्या दारासमोर लावलेल्या दोन सायकलींचा चक्काचूर झाला आहे. तत्पूर्वी प्रवेशद्वाराजवळील वीज वितराच्या पोलची या धक्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान निट्टूर गावच्या प्रवेशद्वाराजवळील धोकादायक वळणावर रस्त्याच्या बाजूला विद्युत पोल आहे. हा पोल रस्त्यापासून बाजूला हटवा यासाठी गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरणला निवेदन दिले होते. अनेक वाहनांनी या पोलला धडक दिली होती.

Related posts: