|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात 10 बेकरी कर्मचाऱयांना डेंग्यू

चिपळुणात 10 बेकरी कर्मचाऱयांना डेंग्यू 

प्रतिनिधी/ चिपळूण

शहरातील एका नामांकित बेकरीतील तब्बल 10 कर्मचाऱयांना एकाचवेळी डेंग्यूची  लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याची आरोग्य यंत्रणेला काहीही माहिती नसल्याने ती किती निद्रिस्त आहेत, हे स्पष्ट होत आहे.

 शहरात अनेक बेकऱया असून त्यात मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक कामगारही आहेत. एका नामांकित बेकरीत सुमारे 25 हून अधिक कर्मचारी आहेत. त्यातील दहाजणांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात काही दिवस उपचार करण्यात आले. मात्र या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

  मात्र आता या बाबत चर्चा सुरू असल्याने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. मात्र या बाबत शहरातील आरोग्य यंत्रणेकडे कोणतीही नोंद नाही. गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे अनेक रूग्ण आहेत. मात्र हे सर्वजण खासगी रूग्णालयात उपचार घेऊन घरी जातात. त्यामुळे याची शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नोंद होत नाही. विशेष म्हणजे ज्या खासगी रूग्णालयांमध्ये उपचार केले जातात, तेही याची कल्पना शासकीय यंत्रणेला देत नाहीत. त्यामुळे या बाबत नियम आणण्याची गरज आहे.

Related posts: