|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंचिमचा उद्या समारोप

आंचिमचा उद्या समारोप 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात पणजी येथे चालू असलेल्या 48व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप जवळ आला असून तो उद्या मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी 4 वा. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बाबोळी येथे होणार आहे. दरम्यान ‘एस दुर्गा’ या बहुचर्चित चित्रपटाचे परीक्षण इंडियन पॅनोरमाचे परीक्षक मंडळ आज दि. 27 रोजी सायंकाळी करणार असून त्यानंतर तो दाखवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

‘थिंकिंग ऑफ्ढ हिम’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ्ढ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सलमान खान व पॅटरिना कैफ्ढ हे चित्रपट क्षेत्रातील दोन दिग्गज कलाकार त्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे यापुर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या महोत्सवात एकूण 195 चित्रपट दाखविण्यात आले. देश-विदेशातील रसिकांनी त्यांचा आनंद लुटला. 

‘एस दुर्गा’ प्रदर्शनाची जागा अनिश्चित

समारोपाचा चित्रपट कला अकादमी पणजी येथे सायं. 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. ‘एस दुर्गा’ या चित्रपटाचे प्रदर्शन फ्ढक्त इंडियन पॅनोरमाच्या परीक्षक मंडळासाठी असून ते कोठे होणार हे जाहीर करण्यात आलेले नाही. प्रतिनिधींची विनाकारण गर्दी होईल म्हणून त्याची वाच्यता करण्यात आलेली नाही. परीक्षक मंडळाने निर्णय जाहीर करण्यात येईल. कारण तो महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्या चित्रपटाचे प्रदर्शन कधी होणार याची विचारणा प्रतिनिधी सातत्याने करीत असून त्यासाठी अनेकजण माघारी फिरण्याचे थांबले आहेत.

एस दुर्गाचे कलाकार तसेच दिग्दर्शक शशीधरन गोव्यातील महोत्सवात ठाण मांडून बसले असून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Related posts: