|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कारने ठोकरल्याने महिला ठार

कारने ठोकरल्याने महिला ठार 

प्रतिनिधी / बेळगाव

भरधाव कारने दुचाकीला ठोकरल्याने भडकल गल्ली येथील एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलजवळ हा अपघात घडला. या अपघातात पती जखमी झाला आहे.

स्मिता गजानन जाधव (वय 42, रा. भडकल गल्ली) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पती गजानन वामनराव जाधव (वय 50) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहे. स्मिता यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दीर, नणंद, भावजयी असा परिवार आहे. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत रक्षाविसर्जन होणार आहे.

रहदारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. होंडा ऍक्टीव्हावरुन मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गजानन व स्मिता हे आपल्या घरी जात होते. त्यावेळी केए 22 एमए 2125 क्रमांकाच्या कारने होंडा ऍक्टीव्हाला ठोकरल्याने हे दांपत्य गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता स्मिता यांचा मृत्यू झाला.

Related posts: