|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोटारसायकलीची टेम्पोला धडक, दोघे जखमी

मोटारसायकलीची टेम्पोला धडक, दोघे जखमी 

वार्ताहर/ उचगाव

उचगाव-कोवाड मार्गावर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला एका  मोटारसायकलस्वाराने टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

या घटनेची अधिक माहिती अशी की बसुर्ते गावचे परशराम दुर्गाप्पा नाईक (वय 31) व महेंद्र शिवाजी नाईक (वय 15) हे दोघे मोटारसायकलीवरून (के.ए.22 ई.डब्ल्यू 0738) बसुर्ते गावाच्या दिशेने चालले होते. याच दरम्यान बेकिनकेरे येथील परशराम भुजंग भडांगे हे आपला टेम्पो (के.ए.22बी 6039) घेऊन बेकिनकेरे गावाच्याच दिशेने चालले होते. मोटारसायकलस्वार भरधाव वेगाने चालले होते. त्यांनी टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. दोघेही उडून रस्त्यावर फेकले गेले यामध्ये दोघांचेही उजवे पाय मोडले आहेत. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. असून उपचार चालू आहेत. परशराम हा गवंडी व्यवसाय करतो तर महेंद्र हा उचगाव येथील माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतो आहे.

Related posts: