|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पं. नारायण बोडस यांचे निधन

पं. नारायण बोडस यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे  :

संगीत नाटकांमधील अभिनेते पं.नारायण बोडस यांचे आज पुण्यात निधन झाले.ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते.त्यांनी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.

थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱया बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ’सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली.

दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱया दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्मया चेहऱयाचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ’सं. शारदम्’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि 1993 मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. 12 वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर 2006 सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.

Related posts: