|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सभागृह बंद पाडू : धनंजय मुंडे

शेतकऱयांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सभागृह बंद पाडू : धनंजय मुंडे 

औरंगाबाद / प्रतिनिधी :

फडणवीस सरकार हे निव्वळ बोलघेवडे आहे. जनतेला दिलेली आश्वासने पाळण्याऐवजी फक्त दिखावूपणातच या सरकारला रस असून, अद्याप कर्जमाफीचीही अंमलबजावणी होवू शकलेली नाही. शेतकऱयांना योग्य न्याय मिळाला नाही, तर येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृह बंद पाडू, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात मुंडे सहभागी झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, सरकारचे निर्णय शेतकरीविरोधी आहेत. सरकारने आतापर्यंत दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. सरसकट कर्जमाफीची सरकारने घोषणा केली. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली अद्याप नाही. यामध्ये मोठी अनागोंदी झालेली दिसते. या प्रश्नावर शिवसेना ही भाजपला विरोध करत असल्याचे जाणवते. सरकारमध्ये असलेला शिवसेना पक्ष बाहेर आणि प्रसारमाध्यमातून फक्त विरोध करतो. मात्र, सभागृहात ते शांत बसतात. शिवसेनेच दोन्ही बाजूंनी वाजवण सुरू आहे. जनतेला आता हे कळून चुकले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. कपाशीच्या पिकाचे बोंड अळीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ पाहणी करावी. शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Related posts: