|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » अमर आंब्रे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अमर आंब्रे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 

पिंपरी / प्रतिनिधी :

मराठा इन्फन्ट्रीचे जवान व मूळचे रत्नागिरी, खेडमधील मौजे चिरणी गावचे अमर आत्माराम आंबे यांचे राजस्थान येथे अपघाती निधन झाले. ते 34 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात व लष्करी इतमामात सोमवारी दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंब्रे यांनी जवळपास 15 वर्षे लष्करात सेवा केली. मूळचे चिरणी येथील असणारे आंब्रे कुटुंबीय पिंपरी-चिंचवडमधील चिखली, मोरेवस्ती येथे स्थायिक झाले होते. अमर यांना लहानपणापासून लष्करात जाण्याची इच्छा होती. त्यानुसार मोठय़ा जिद्दीने लष्करात भरती होत त्यांनी आपली सेवा बजावली. त्यांच्या निधनाने चिरणी,  मोरेवस्ती, चिखली परिसर शोकसागरात बुडाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ताकाका साने यांनी अमर यांची अभ्यासवृत्ती व राष्ट्रगुणांची प्रशंसा करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमर आंब्रे कर्तव्यदक्ष, वीर जवान व कोकणचे सुपुत्र होते, अशा शब्दांत शब्दब्रह्म काव्यमंचचे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नागरिक संघाचे लालासाहेब मोरे, कॅप्टन महादेव आंब्रे, श्रीपतराव कदम, राजाराम आंब्रे, संभाजी आंबे, पांडुरंग कदम यांच्यासह चिरणी व चिखली गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते.

 

 

Related posts: