|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मृगजळ देखोनि डोळां

मृगजळ देखोनि डोळां 

सर्वसुख म्हणजे दु:खरहित सुख, दु:खाची ओळखही नसणारं सुख. सर्वसुखाचा आराम असा देव वा आत्मरूप हे देहातच असलेमुळे जीवाला दु:ख होण्याचं कारणच नाही. परंतु घरातच अफाट संपत्ती पुरून ठेवलेली आहे ही सत्यकथा माहीत नसल्यामुळे त्या अफाट संपत्तीचा मालक दारिद्रय़दु:ख भोगतो. त्या दु:खाचे खरे कारण त्याचे अज्ञान नव्हे का? अगदी तसेच अज्ञान आपल्या स्वरूपाबद्दल आपल्याला असते. आपण स्वतः सुखरूप आहोत हेच आपणास माहीत नसते. त्यातूनच देह म्हणजेच मी असा भ्रम निर्माण होतो. असा भ्रांत जीव देहसुखासाठी धडपडत राहतो. स्वसुख सोडून तो नाना विषयभोगाकरिता रंक बनतो. कशानेही त्याच्या मनाची तृप्ती होत नाही. तो सदाचा, नेहमीच अतृप्त व असमाधानी असतो. अशा भ्रांत पुरुषाची स्थिती किती दुर्दैवी असते याची दोन सुंदर उदाहरणे ज्ञानेश्वर माउलींनी दिली आहेत.

अत्यंत उन्हाळय़ाच्या दिवसात, माध्यान्हकाळी, रखरखीत उन्हातून एक माणूस चालला होता. ते कच्छचे रण होते आणि पाणी मिळण्याची मुळीच आशा नव्हती. त्याला अतिशय तहान लागली होती. तो आपल्या ओठांवरून जीभ फिरवीत होता. तहानेने व्याकूळ होऊन तो पडणार तर नाही ना अशी त्याची अवस्था होती. त्या बाजूने एक साधू चालला होता. त्याची ती अवस्था पाहून साधूला करूणा आली. तो त्या माणसाजवळ गेला आणि त्याने आपल्या कमंडलूतले पाणी त्याला दिले आणि तो निघून गेला. ते पाणी म्हणजे त्या माणसाचा जीव वाचवणारे जणू अमृतच होते. ते पाणी त्या माणसाने तोंडात घेतले आणि तो त्या पाण्याचा घोट घेणार, तोच त्याला त्या रणरणत्या वाळवंटात खूप पाणी वाहताना दिसले. ते वाहते पाणी पाहून त्या माणसाला वाटले की साधूने दिलेले पाणी किती शिळे असेल कोण जाणे! ते घाणेरडे पाणी पिण्यापेक्षा हा वाहता झराच कितीतरी चांगला नाही का? त्याला साधुकडून मिळालेले अमृत त्याने थुंकून टाकले आणि ताज्या पाण्याच्या आशेने तो दिसलेल्या मृगजळाच्या पाठी धावत सुटला.

बहु मृगजळ देखोनि डोळां ।  थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।

तोडिला परिसु बांधिला गळां ।  शुक्तिकालाभें ।

पाण्याच्या देखाव्याला भुलून हा कर्मदरिद्री माणूस खऱया पाण्याला ओलांडून गेला. मृगजळाच्या आभासाला भुलून हाती आलेल्या, जवळ असलेल्या अमृताला, स्वहिताला तो मुकला. तीच अवस्था आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांची आहे.

असाच एक अत्यंत दरिद्री माणूस समुद्र तीरावरून फिरत होता. चार, चार दिवस उपवास पडत त्याला. त्याचे ते दु:ख पाहून एका अधिकारी साधूला फारच कळवळा आला. त्याचे दारिद्रय़ कायमचे नष्ट व्हावे म्हणून त्या साधूने त्याच्या गळय़ात एक परिस बांधला. तो दरिद्रीनारायण तसाच पुढे चालू लागला. तो त्या परिसाला वारंवार हात लावी. त्याला त्याचे मोठे कौतुक वाटे. हा दगड आपल्या गळय़ात त्या साधूने का बांधला असेल याचेच त्याला कोडे वाटे.

Related posts: