|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तीन विद्यार्थ्यांची शाळा ‘डिजिटल’

तीन विद्यार्थ्यांची शाळा ‘डिजिटल’ 

मुणगेआडवळवाडी जि. . शाळा नं. 2 चा उपक्रम

तीन वर्षे पटसंख्येवर तीनच विद्यार्थी

ग्रामस्थांच्या एकोप्याने घडली डिजिटल क्रांती

विद्यार्थ्यांच्या हाती आलेटॅब

शंकर मुणगेकर / मुणगे:

सध्याचे युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. शालेय जीवनातल्या बालमनाला बदलत्या तंत्रज्ञानाचे बाळकडू मिळावे, बुद्धिमत्तेला चालना देणारी प्रगत तंत्रज्ञानाने विकसित असणारी साधने अभ्यासूवृत्तीने हाताळता यावीत, यासाठीडिजिटल शाळाही संकल्पना उदयास आली. जेथे विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त, त्या शाळा डिजिटलच्या उंबरठय़ावर सर्वप्रथम आल्या. यात खासगी संस्थांच्या शाळांसह जि. . च्या प्राथमिक शाळांचाही समावेश आहे. मात्र, जि. . ची अशी एक शाळा देवगड तालुक्यातील मुणगेसारख्या ग्रामीण भागात आहे, जीडिजिटलकरण्यात आली आली, तीदेखील केवळ तीन बालविद्यार्थ्यांसाठी! त्याहूनही अभिमानास्पद असे की, हे तीनही विद्यार्थी पहिलीपासून तिसरीपर्यंतचे शिक्षण एकत्र घेत आहेत. या तीन वर्षात पटसंख्येवर नव्या नावाची नोंद नाही. केवळ तीन विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने ही शाळा डिजिटल करण्यात आली, ही खऱया अर्थानेडिजिटल युगातील क्रांतीम्हणता येईल.

देवगड मालवण तालुक्याच्याबॉर्डरवर असणारा मुणगे हा बारा वाडय़ांचा गाव. या गावातील मुणगे आडवळवाडी येथील पहिली ते चौथीपर्यंत असणारी जि. . शाळा नं. दोन ही नुकतीच डिजिटल करण्यात आली. या शाळेची एकूण पटसंख्या फक्त तीनच आहे. तरीही ग्रामस्थ, देणगीदारांच्या सहकार्यातून ही शाळा तेथे कार्यरत शिक्षकांनी डिजिटल केली. या शाळेची स्थापना 1932 पूर्वी करण्यात आली होती. त्यावेळी ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत होती. तेथील महाजनसामंत कुटुंबियांनी बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीतनर्मदाबाई देसाई टोपीवाले शाळा नं. 2’ या नावाने ही प्राथमिक शाळा उभी राहिली होती. जिल्हा विभाजनापूर्वी ही शाळा मालकी तत्वावर सुरू होती. कालांतराने जि. . ने ही शाळा आपल्या ताब्यात घेतली. त्याकाळी वाघोळी येथे प्राथमिक शाळा नं. 1 कार्यरत होती. जि. . ने शाळा नं. 2 आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी गावातील 12 वाडय़ांतील लोकसंख्येच्या मानाने मुलांची संख्या लक्षात घेता या दोन्ही शाळांमध्ये पूर्वी प्रत्येकी दीडशे ते दोनशे मुलांची पटसंख्या दिसायची. आता या गावात जि. . च्याच एकूण सात प्राथमिक शाळा आहे. गावातील वाडय़ांमधील अंतर लक्षात घेता मागणीनुसार निर्माण करण्यात आलेल्या शाळांमुळे पूर्वीच्या दोनही शाळांची पटसंख्या विभागली गेली. याचा परिणाम, आमच्या वाडीतील शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती.

अंतरानेशिक्षणविभागले!

बारा वाडय़ांच्या या गावात आजही सरासरी सुमारे दोनशे विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. गावातील सात प्राथमिक शाळांमध्ये जि. . प्राथमिक शाळा नं. 1 (भगवती मंदिरनजीक) मध्ये विद्यार्थ्यांची सर्वाधिक पटसंख्या दिसून येते. तर सर्वात कमी म्हणजे अवघी तीन मुले जि. . प्राथमिक शाळा नं. 2 (आडवळवाडी) मध्ये शिक्षण घेतात. हा फरक वाडीपासून शाळांचे अंतर या कारणामुळेच असावा, असे स्पष्ट होते. तर या सात शाळांमधील आडबंदर प्राथमिक शाळा कमी पटसंख्येअभावी गतवर्षीपासूनच बंद करण्यात आली. या शाळेच्या पटसंख्येवरील इयत्ता पहिलीतील दोन विद्यार्थी शाळा नं. एक मध्ये दाखल झाले.

शाळेच्या प्रेमापोटी ग्रामस्थ एकवटले!

आडवळवाडीची लोकसंख्या अंदाजे 50 च्या आसपास आहे. तेथील प्राथमिक शाळा नं. 2 ही स्वातंत्र्यापूर्वीचीच. त्यामुळे ही शाळा पटसंख्येअभावी बंद पडता शैक्षणिक गुणवत्तेला आकार देणारी ठरावी, या शाळेच्या प्रेमापोटी स्थानिक ग्रामस्थ एकवटले. मुलांची पटसंख्या हातावरील बोटांवर मोजण्याएवढी असली तरी त्या विद्यार्थ्यांना याच शाळेत शिक्षणाचे धडे द्यावेत, अशी विनंती ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱयांना केली. या विनंतीनुसारच ही शाळा कमी पटसंख्या असली तरी आजतागायत सुरू आहे.

तीन वर्षे तीनच विद्यार्थी

आडवळवाडी शाळा नं. 2 वगळता गावातील कोणतीही प्राथमिक शाळा दुहेरी पटसंख्येच्या खाली नाही. ज्या तीन विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीपासून शिक्षण सुरू केले, तेच तीन विद्यार्थी आज तीन वर्षांनी तिसरीत आहेत. विदित अरुण रासम, निषांत अजित रासम रिया शिवदास रामस हे तीन विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या तीन वर्षात कालावधीत पटसंख्येवर कोणत्याही नवीन विद्यार्थ्यांचे नाव दाखल झालेले नाही. तरीही कार्यरत शिक्षकांनी आपले मनोबल खचवता शिक्षणाचे धडे सुरू ठेवले आहेत. आज या शाळेवर मुख्याध्यापकपदी रामेश्वर मांटे सहाय्यक शिक्षक म्हणून स्वप्नील कामत हे कार्यरत आहेत.

अन् शाळा झाली डिजिटल

आजच्या प्रगत तंत्रज्ञानात शाळाही डिजिटल असावी, ही संकल्पना उदयास आली. ही संकल्पना आडवळवाडीतील ग्रामस्थांनी तीन विद्यार्थ्यांसाठी सत्यात उतरविण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित रासम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, देणगीदार कार्यरत शिक्षकांच्या सहकार्यातून आडवळवाडी जि. . प्राथमिक शाळा नं. 2 खऱयाअर्थाने डिजिटल करण्यात आली. शाळेत संगणक आलाच. शिवाय त्या तीन विद्यार्थ्यांच्या हाती डिजिटल अभ्यास करण्यासाठीटॅबआले. 50 हजाराहून अधिक खर्च डिजिटल शाळेसाठी करण्यात आला.

आडवळवाडी शाळा बंदच्या उंबरठय़ावर?

शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना गेली तीन वर्षे ज्या शाळेची पटसंख्या अवघी तीनच आहे, अशी जि. . प्राथमिक शाळा नं. 2 ही केवळ ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे सुरू आहे. ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असली तरी जे विद्यार्थी आज तिसरीत शिकत आहेत, ते पुढील वर्षी चौथीत प्रवेश करतील. मग त्यानंतर काय? पटसंख्येवर नवीन मुलांची नोंद झाली नाही तरीही डिजिटल शाळा बंदच्या उंबरठय़ावर जाणार, हे निश्चित!

Related posts: