|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » एस ऍण्ड पीच्या मानांकनानंतरही बाजारात तेजी

एस ऍण्ड पीच्या मानांकनानंतरही बाजारात तेजी 

बीएसईचा सेन्सेक्स 45, एनएसईचा निफ्टी 10 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था / मुंबई

सप्ताहाची सुरुवात तेजीने झाली. बाजारात पहिल्यांदा घसरण झाली, मात्र त्यानंतर रिकव्हरी करण्यात बाजार यशस्वी ठरला. दिवसातील घसरणीदरम्यान निफ्टी 10,340 आणि सेन्सेक्स 33,540 पर्यंत पोहोचला होता. एस ऍण्ड पीने भारताच्या मानांकनात सुधारणा न केल्याने ही घसरण झाली होती. मात्र दिवसअखेरीस निफ्टीने 60 आणि सेन्सेक्सने 200 अंशाची घसरण भरून काढली.

बीएसईचा सेन्सेक्स 45 अंशाच्या तेजीने 33,724 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 10 अंशाने वधारत 10,399 वर बंद झाला.

कमजोर बाजारातही मिडकॅप समभागात तेजी कायम होती. पहिल्यांदाच निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 20,000 च्या पलीकडे पोहोचण्यास यशस्वी ठरला. 0.5 टक्क्यांनी वधारत 20,085 वर स्थिरावला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

बँक समभागात चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत 25,832 वर बंद झाला. मीडिया, वाहन, रिअल्टी, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू समभागात खरेदी झाली. धातू, एफएमसीजी, तेल आणि वायू समभागात दबाव आला होता.

दिग्गज समभागांची कामगिरी

एनटीपीसी, ऍक्सिस बँक, झी एन्टरटेनमेन्ट, टाटा पॉवर, ओएनजीसी, एसबीआय, विप्रो 3.4-0.8 टक्क्यांनी मजबूत झाले. एचपीसीएल, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, अंबुजा सिमेंट, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स डीव्हीआर 1.5-0.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात ईमामी, आदित्य बिर्ला फॅशन, अशोक लेलँड, अदानी पॉवर, रिलायन्स इन्फ्रा 5-3.1 टक्क्यांनी वधारले. जेएसडब्ल्यू स्टील, एबीबी इंडिया, ओबेरॉय रियल्टी, राजेश एक्स्पोर्ट्स 2.4-1.25 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात नेलकास्ट, गुडरिक ग्रुप, शैली इंजीनिअरिंग, हॅथवे केबल, स्वेलेक्ट एनर्जी 18.4-11.3 टक्क्यांनी वधारले. लक्ष्मी विलास बँक, सोरिल इन्फ्रा, व्ही. बी. इन्डस्ट्रीज, अलंकित, अर्शिया 6.6-4.3 टक्क्यांनी घसरले.

Related posts: