|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैभववाडीत पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातजणांचा चावा

वैभववाडीत पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातजणांचा चावा 

वार्ताहर / वैभववाडी:

शहरात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत माजवली असून सोमवारी एकाच दिवशी सात जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामध्ये वैभववाडीतील पाच एडगाव येथील दोघांचा समावेश आहे.

भटक्या कुत्र्यांची समस्या शहरात गंभीर झाली असून पिसाळलेल्या कुत्र्याने वैभववाडीतील विजया विजय शिरवलकर (48), संजय बापू निकम (33), श्रावणी उदय गजोबार (7), सुशिला दादू गजोबार (70) तर एडगावचे कृष्णाजी विष्णू देसाई, दीपक चंदू सूर्यवंशी यांचा समावेश आहे. यांच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार नीतेश राणेंचे सहकार्य

वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी देवगड येथून कुत्रे पकडण्यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून टीम पाठविण्यात आली असून पिसाळलेल्या कुत्र्यांसह पाच कुत्र्यांचा बंदोबस्त केल्याची माहिती नगराध्यक्ष संजय चव्हण यांनी दिली.

Related posts: