|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उघडय़ावर कचरा फेकणाऱयांवर होणार कठोर कारवाई!

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांवर होणार कठोर कारवाई! 

मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांची माहिती

स्वच्छतेबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासन गंभीर

वार्ताहर / कुडाळ: 

कुडाळ शहरातील कचरा घंटावाहनाद्वारे संकलन केला जात आहे. मात्र, या मोहिमेला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही काही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नगरपंचायतीने रस्त्याच्या कडेला उघडय़ावर कचरा फेकणाऱयांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. उघडय़ावर कचरा टाकताना आढळलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोटो काढून व्हॉट्सऍपद्वारे 9637720470 या क्रमांकावर पाठवावा. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आवाहन . पं. चे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कुडाळ . पं. मार्फत 20 मार्च 2017 पासून घंटावाहनाद्वारे कचरा संकलनास सुरुवात केली आहे. शहरातील 80 कुंडय़ा हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्याकडेचे ढीग आपोआप नाहिसे झाले. बऱयाच नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. काही लोक कचरा देण्यास आळस करतात. रस्त्याच्याकडेला कुंडय़ाच नसल्यामुळे अशा लोकांकडून रात्रीच्यावेळी असा कचरा रस्त्याच्याकडेला फेकला जातो. त्यामुळे काही ठिकाणी असा कचरा दिसून येतो. परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. घनकचरा अधिनियम 2016 नुसार कचरा वर्गीकरण करूनच . पं. च्या ताब्यात देणे बंधनकारक आहे. दंडात्मक तरतुद तसेच कायदेशीर कारवाईपेक्षा लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. या कारणाने अद्याप कठोर कारवाई केलेली नाही. परंतु जे लोक या मोहिमेला प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध आराखडा

यापुढील काळात स्वच्छतेसाठी . पं. ने नियोजनबद्ध आराखडा बनविलेला असून तो पुढील एका महिन्यात कागदावरुन प्रत्यक्ष अंमलबजावणीत येईल. कंत्राटी मानवी सेवेमधून आठ नवीन कर्मचारी पुढील आठवडय़ात . पं. कडे दाखल होणार आहेत. मुख्य रस्त्याच्या सफाईसाठी कर्मचारी नियुक्त करणार आहोत. तसेच चार नवीन घंटावाहने कचरा संकलनासाठी डिसेंबर महिन्यात रस्त्यावर दिसतील, असे या पत्रकात म्हटले आहे.

घरोघरी जाऊन घंटावाहनाद्वारे कचरा संकलन सुरू केल्याने . पं. चे बारा सफाई कर्मचारी यात गुंतले असल्याने रस्ता सफाईकरिता कर्मचारी अपुरे पडत होते. मानवी सेवेमुळे तो प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच कविलकाटे, मस्जिद मोहल्ला, कुंभारवाडी, गोधडवाडी येथे यापूर्वीच्या काळात ट्रक्टरची सुविधा उपलब्ध नव्हती. तेथील मुख्य रस्त्यावरुन घंटावाहनाची सेवा पुरविली जाणार आहे.

प्लास्टीक पिशव्या बंदीसाठी स्वतंत्र पथक

. पं. मार्फत 1 जानेवारीपासून प्लास्टीक पिशव्या बंदीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याला बरेच दुकानदार, व्यापारी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु फळवाले, भाजीवाले इतर विक्रेत्यांकडून त्याला पळवाट शोधून इतर प्लास्टीक पिशव्यांचा वापर वाढविला आहे. त्याकरिता 14 नोव्हेंबर 2017 च्या सर्वसाधारण सभेत सरसकट प्लास्टीक पिशव्या बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून किराणा माल खाद्यपदार्थांचे अत्यावश्यक पॅकिंग यांना वगळले आहे. प्लास्टीक पिशव्या विक्री करणाऱया व्यापाऱयास वापरणाऱयास दंड आकारण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्लास्टीक बंदीला दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही काही कापड दुकानदार आजही प्लास्टीक पिशव्यांचा वापर करीत आहेत. अशा दुकानदारांवर प्रथम कारवाई केली जाणार आहे.

एकंदरीत स्वच्छतेच्या बाबतीत . पं. प्रशासन गंभीर असून पुढील एका महिन्यात वाढीव कर्मचारी, चार घंटावाहने या उपलब्धतेमुळे परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळेल, असे या पत्रकात म्हटले आहे.

Related posts: