|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भगवतीनगरमध्ये तीन कुटुंबे वाळीत

भगवतीनगरमध्ये तीन कुटुंबे वाळीत 

खोपटवाडीतील घाणेकर कुटुंबीयांची तक्रार

शिमगोत्सवाच्या वादातून अन्याय

तहसीलदार, पोलीसांकडे न्यायाची मागणी

वार्ताहर /गणपतीपुळे

शिमगोत्सव वादातून गावातील प्रमुख व्यक्तींच्या निर्देशानुसार तीन कुटुंबांना वाळीत टाकल्याची घटना भगवतीनगर खापटवाडी येथे घडली आह़े याबाबत रविंद्र घाणेकर यांनी रत्नागिरी तहसीलदार व जयगड पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. आपल्या व कुटुंबीयांच्या जीवास धोका असल्याने या सर्वांवर योग्य कारवाई करण्याची मागणी घाणेकर यांनी केली आहे.

निवेंडी भगवती गावचे ग्रामदैवत श्री भावकाय देवी मंदिरातील मानकऱयांमध्ये वाद विकोप्याला गेल्याने तहसिलदारांनी शिमगोत्सवावेळी 144 कलम लागू करत उत्सवावर बंदी आणली होत़ी मात्र शिमगोत्सव बंद झाल्यानंतर गावातील काही सुजाण ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शिमगोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबतचे निवेदन तहसिलदारांना दिल़े या निवेदनावर सतीश सोनळकर यांच्या समर्थकांच्या सह्या नव्हत्य़ा मात्र त्यांच्याच वाडीतील रवींद्र शिवराम घाणेकर व दिवाकर घाणेकर आणि कुटुंबियांनी सह्या केल्या होत्य़ा

याचा राग धरून 31 ऑगस्ट रोजी वाडीतील 6 वाडय़ांचे मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक बोलावली. यात शिमगोत्सव सुरू करण्याबाबत तहसिलदारांना दिलेल्या अर्जावर स्वाक्षरी का केली असा जाब विजारत घाणेकर कुटुंबियांना वाळीत टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आल़ा कुटुंबियांसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचे फर्मानच काढण्यात आल्याचे घाणेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

घाणेकर कुटुंबियांनी अनेकवेळा ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न केल़ा परंतु अनेक लोकांनी त्यांच्याकडे जाणून-बूजून दुर्लक्ष केले. हा सर्व प्रकार मंदिरातील उत्सव सुरू करण्यासाठी तहसिलदारांना दिलेल्या अर्जावर सह्या केल्यामुळे झाला असल्याचे रवींद्र घाणेकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आह़े याप्रकारामागे सहा वाडय़ातील मानकरी व मंदिराचे विश्वस्त सतीश सोनळकर हेच असून ते गावातील मोठे जमिनदार व राजकीय नेते असल्याचे गावामध्ये तसेच सरकारी यंत्रणांमध्ये त्यांचा मोठा दबाव असल्याचे तक्रारीत म्हटले आह़े

या प्रकारांबाबत रवींद्र घाणेकर यांनी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन जयगड व रत्नागिरीचे तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार देऊन आम्हाला नाहक त्रास दिला जात असल्याचे म्हटले आह़े व संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आह़े

Related posts: