|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सातवायंगणी येथे दोन लाखाची दारू जप्त

सातवायंगणी येथे दोन लाखाची दारू जप्त 

वेंगुर्ले पोलिसांची मध्यरात्री काराई

कार टाकून चालक पसार

वार्ताहर / वेंगुर्ले:

मळेवाडसावंतवाडी रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी पाहून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी मारुती सुझुकी कार चालकाने मागे परतली. चालकाने आरोंद्याच्या दिशेने पळ काढला. मात्र, या कारचा पाठलाग वेंगुर्ले पोलीस निरीक्षक कोळी यांच्या पथकाने केला. मातोंडसातवायंगणी येथे रविवारी मध्यरात्री एक वाजता गाडीतून उडी टाकून चालक पसार झाला. या गाडीत एक लाख 84 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या सहा महिन्यातील ही मोठी कारवाई आहे.

वेंगुर्ले पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी अभिजित कांबळे यांना मिळालेल्या गोपनिय महितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल धुरी, अंजन नाईक, दत्तात्रय पाटील या पथकाने रविवारी रात्री 11.30 वाजता मळेवाड सावंतवाडी रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास सोनेरी रंगाची मारुती सुझुकी (एमएच07-आर-278) ही कार आली. मात्र, पोलिसांची नाकाबंदी पाहून लगेच ती वळवून आरोंद्याच्या दिशेने पळ काढला. या कारचा पाठलाग तात्काळ पोलीस निरीक्षक शिवाजी कोळीसह पथकाने केला. ही कार मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मातोंडसातवायंगणी येथे उघडय़ा दरवाजासह आढळली. मात्र, चालकाने पळ काढला. यात कारमध्ये बॅण्डीच्या 180 मिली बॉटलचे 10 बॉक्स, नॅशनल डिस्टिलिटरीज नावाचे 180 मिली बॉटलचे 10 बॉक्स, ब्ल्यू ओकेन नावाची व्हिस्की होडका असे पाच याप्रमाणे 10 बॉक्स अशी गोवा बनावटीची सर्व दारुची एकूण किंमत एक लाख 84 हजार 320 गाडीची किंमत सहा लाख रुपये असा सात लाख 84 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत महाराष्ट्र प्रोव्हिजन ऍक्ट कलम 65 ()() अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Related posts: