|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इवांकाच्या भारत दौऱयाअगोदर वादंग

इवांकाच्या भारत दौऱयाअगोदर वादंग 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप समिट मंगळवारपासून भारतात सुरू होणार आहे. ही परिषद अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका या परिषदेत भाग घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अनावरण करणार आहेत. इवांका यांच्यासमवेत 100 निवडक नवोन्मेषी उद्योजकांसोबत मोदी  एका कार्यक्रमात सामील होतील. परंतु इवांकाच्या दौऱयावरून अमेरिकेत वाद निर्माण झाला. तिच्या या दौऱयामुळे व्हाइट हाउस आणि अमेरिकेच्या विदेश विभागादरम्यान मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

28-30 नोव्हेंबर या कालावधीत हैदराबादमध्ये ही जागतिक परिषद आयोजित होईल. यात 1500 उद्योजकांसमवेत 2000 शिष्टमंडळांचा सहभाग असणार आहे. ‘वुमन फर्स्ट अँड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ असे या परिषदेचे घोषवाक्य आहे.   इवांका ट्रम्प या उद्योजिका या नात्याने या परिषदेत सहभागी होतील. त्यांच्या सल्ल्यावरच अध्यक्ष ट्रम्प यांनी उद्योजिकांकरता स्वतंत्र निधीसाठी 5 कोटी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती.

विदेशमंत्र्याला संधी नाही

2010 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेचा शुभारंभ केला होता. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या या परिषदांमध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेशमंत्री किंवा अध्यक्षांनीच केले आहे. ओबामांनी अध्यक्ष म्हणून तर जॉन केरी यांनी विदेश मंत्री या नात्याने परिषदेत भाग घेतला होता. परंतु यावेळी ही परंपरा मोडली जाणार आहे.

उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा अभाव

यंदाच्या परिषदेत शिष्टमंडळाचे नेतृत्व विदेश मंत्री रेक्स टिलरसन नव्हे तर इवांका करणार आहेत. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर इवांका यांच्याकडे अमेरिकेचे प्रतिनिधित्व असणारा हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे. या निर्णयामुळे नाराज टिलरसन यांनी इवांकासोबत उच्चस्तरीय अधिकारी न पाठविण्याचे पाऊल उचलले. इवांकामुळे व्हाइट हाउस आणि विदेश विभागातील संघर्ष उघड
झाला.

महिलांच्या मुद्यांवर मौन

इवांका या महिलांच्या मुद्यावर आयोजित परिषदेत भाग घेणार असल्या तरीही त्यांनी महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर मौन बाळगल्याचा आरोप होतो. 4 महिलांचे लैंगिक शौषण केल्याचा आरोप असणारे सिनेट उमेदवार रॉय मूर यांना ट्रम्प यांनी समर्थन दिले. या मुद्यावर इवांकांनी मत व्यक्त केलेले नाही. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये महिलांचे आरोग्य आणि अधिकारांचे महत्त्व सातत्याने कमी होत असल्याचा आरोप होतोय.

वस्त्राsद्योग कर्मचाऱयांचा मुद्दा

इवांका यांच्या फॅशन उद्योगाला हातभार लावणाऱया भारतीय वस्त्राsद्योग कर्मचाऱयांविषयी त्या काही बोलतील का असा प्रश्न वॉशिंग्टन पोस्टने उपस्थित केला. इवांका याच्या ब्रँडमध्ये वापरली जाणारी सामग्री चीन, भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधून  येते, इवांका यांची कंपनी भारतात तयार झालेली उत्पादनांची विक्री करते, मग त्या भारतीय वस्त्राsद्योगात काम करणाऱया महिलांच्यास समस्या मांडतील का असा प्रश्न वृत्तपत्राने मांडला.

Related posts: