|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजशिष्टाचाराच्या भंगांमुळे निमंत्रण पत्रिका पुनर्छपाईची वेळ

राजशिष्टाचाराच्या भंगांमुळे निमंत्रण पत्रिका पुनर्छपाईची वेळ 

दापोली कृषी विद्यापीठ प्रशासनाची नामुष्की

कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव सर्वात शेवटी

निमंत्रण पत्रिका पुन्हा छापण्याची विद्यापीठावर आफत

प्रतिनिधी /दापोली

खखदापोली येथे होणाऱया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्र्यांच्या नावाचा क्रम चुकल्याने राजशिष्टाचाराचा भंग झाला आहे. त्यामुळे या निमंत्रण पत्रिका बदलून पुन्हा छापण्याची नामुष्की या स्पर्धेचे यजमान असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनावर आली.

दापोली विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी राज्यातील 20 विद्यापीठांतील विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. यावर्षी या महोत्सवाचे यजमानपद दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाकडे आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन तसेच समारोप कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शहरातील तसेच सर्व राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱयांना पाठवण्यात आली होती. ही पत्रिका भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ती वाचली असता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव या निमंत्रण पत्रिकेत इतर मंत्र्यांच्या नावांच्या क्रमाने शेवटी टाकल्याचे आढळून आले.

या पत्रिकेतील क्रमवारीत या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून क्रीडा मंत्री विनोद तावडे यांचे नाव प्रथम, त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकंमत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, प़ृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, कुलुगरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचे नाव व शेवटी ज्येष्ठ मंत्री असलेल्या कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव छापण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साठे यांनी तत्काळ फुंडकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून राजशिष्टाचाराचा भंग झाल्याची ची तक्रार केली.

त्यानंतर मंत्री कार्यालयातून कृषी विद्यापीठाला प्रोटोकॉलसंदर्भात सूचना देण्यात आल्यावर या स्पर्धेच्या यजमान कोकण कृषी विद्यापीठाच्या स्पर्धा आयोजन समितीला निमंत्रण पत्रिका बदलावी लागली आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नव्याने छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत कृषी मंत्री फुंडकर यांचे नाव प्रथम टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठाचे हसे होत आहे.

Related posts: