|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गप्पातून उलघडला भावगीतांचा प्रवास

गप्पातून उलघडला भावगीतांचा प्रवास 

प्रतिनिधी/कोल्हापूर

भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व मैत्र सांस्कृतिक मंचतर्फे आयोजीत कार्यक्रमात गायक डॉ.स्मिता कारखानीस व प्रा.उपेंद्र कारखानीस या गायकांनी गप्पातून उलघडला भावगीतांचा प्रवास. निमित्त होते भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व मैत्र सांस्कृतिक मंचतर्फे सोमवारी झालेल्या ‘गप्पा विसरलेल्या गाण्यांच्या’ या कार्यक्रमाचे.

मराठी भावगीत संगीताला 90 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त डॉ.स्मिता कारखानीस व प्रा.उपेंद्र कारखानीस यांच्या ‘गप्पा विसरलेल्या गाण्यांच्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गप्पातून भावगीते आणि त्यांच्या आठवणी यांचा प्रवास उलघडला. त्यासोबत भावगीतांचे सादरीकरण केले. सुमारे दीड तास सुरू राहिलेल्या कार्यक्रमावेळी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रस्तावना व स्वागत कार्यवाह श्रीकांत डिग्रजकर यांनी केले. यावेळी सुखदा आठल्ये, केंद्र संचालिका अनघा पेंढारकर, संचालिका सुषमा गजबर, व्यवस्थापक उमेश बुधले यांच्यासह  कलारसिक मोठयासंख्येने उपस्थित होते.    

 

Related posts: