|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘त्या’ रस्त्याने पुन्हा घेतले दोघांचे बळी

‘त्या’ रस्त्याने पुन्हा घेतले दोघांचे बळी 

प्रतिनिधी / लातूर

औसा शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या सुलतान टेकडीजवळ ट्रक व कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा गंभीर होता की, कार बरीच लांब फरफटत गेली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश चिद्रे यांनी भेट दिली असून, औसा पोलीस ठाण्याचे पो.नि. सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 19 नोव्हेंबर रोजी याच रस्त्यावर अशाचप्रकारे एसटी आणि ट्रक यांची धडक होऊन सहाजणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच रस्त्यावर पुन्हा अपघात झाल्याने रस्त्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक (एमएच-11 एम 6953) याने समोरुन येणाऱया कार (एमएच-12 बीएम 188) हिला जोराची धडक दिली. या धडकेत कार लांब अंतरावर फरफटत गेली. या अपघातात व्यंकट महादेव माने, (55, रा.कवठा ता.उमरगा) पार्वती माने (45, रा.कवठा ता.उमरगा) हे दोघे जागीच ठार झाले. तर बब्रुवान माने (70, वर्षे, रा.कवठा) व गोपाळ सुरवसे (30) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, जखमींना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

Related posts: