|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वैधमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

वैधमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

प्रतिनिधी / कराड

तीन हजार रुपयांची लाच घेताना वैधमापन शास्त्र कार्यालयातील निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहात पकडले. रवींद्र भगवान आदाटे (रा. विश्वास अपार्टमेंट, ई वॉर्ड, न्यू शाहूपुरी ट्रेड सेंटर, कोल्हापूर, मूळ रा. माधवनगर, सांगली) असे निरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे वैधमापन कार्यालयातील लाचखोरी चव्हाटय़ावर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हे शासनमान्य वजनकाटे दुरूस्ती परवानाधारक आहेत. त्यांच्याकडे 25 इलेक्ट्रीक काटे नुतनीकरण व अधिकृत करण्यासाठी आले होते. त्या काटय़ांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी कराड  विभाग कार्यालयाशी तक्रारदाराने संपर्क साधला. कार्यालयातील निरीक्षक रवींद्र आदाटे यांनी या कामासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. याबाबत 24 नोव्हेंबर 2017 रोजी तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार 27 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कराड कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तीन हजारांची रक्कम घेऊन वैधमापन शास्त्र कार्यालयात आले. त्यांनी तीन हजारांची रक्कम रवींद्र भगवान आदाटे यांच्याकडे मागणीनुसार दिली. तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस नाईक तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, महिला पोलीस कुंभार यांनी छापा टाकून संशयित आदाटेला रंगेहात पकडले. या प्रकरणी कराड शहर पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.

Related posts: