|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मायमोळे वास्कोतील त्या दुमजली इमारतीवर न्यायालयाचा प्रतिकात्मक ताबा

मायमोळे वास्कोतील त्या दुमजली इमारतीवर न्यायालयाचा प्रतिकात्मक ताबा 

प्रतिनिधी/ वास्को

मायमोळे वास्को येथील शेतजमीनीजवळ असलेल्या एका इमारतीसंबंधीच्या व्यवहारावर न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध आलेले आहेत. अशा प्रकारचा एक फलक सोमवारी दुपारी न्यायालय प्रशासनाने त्या इमारतीला लावलेला आहे. सदर इमारतीसंबंधी उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश सरकारला दिलेले असून ही प्रक्रियासुध्दा त्या चौकशीचाच एक भाग आहे.

काल सोमवारी दुपारी मायमोळेतील शेतजमीनीला लागून असलेल्या या दुमजली इमारतीवर 6 नोव्हेंम्बर 2017 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारतीचा प्रतिकात्मक ताबा न्यायालय प्रशासनाने घेतलेला असल्याचा फलक न्यायालयीन प्रशासकीय अधिकाऱयांनी लावला. ही इमारत बेकायदेशीर असल्याचा दावा करून वास्कोतील चंद्रशेखर वस्त या नागरीकाने या इमारतीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार या इमारतीविषयी चौकशीला आरंभ झालेला आहे. सहा आठवडय़ांच्या आत या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याची सुचना उच्च न्यायालयाने केलेली आहे. या याचिकेत मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांनाही प्रतिवादी बनवण्यात आलेले असून सदर इमारतीसंबंधीच्या न्यायालयीन सुनावणीत या इमारतीशी आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिलेले आहे.

 

Related posts: