|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खोला येथे बस उलटून 14 प्रवासी जखमी

खोला येथे बस उलटून 14 प्रवासी जखमी 

वार्ताहर/ खोला

माटावेमळ – खोला येथील पारयेकट्टा उणस वळणावरील धारदार उतरणीवर एका मिनीबसला झालेल्या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले. जखमीवर उपचार चालू आहेत.

आगोंद वाल येथील एका कपेलमध्ये प्रार्थना होती आणि या प्रार्थनेला असोळणे येथील काही भावीक सदर मिनीबसमधून जात होते. पारयेकट्टा उणस येथील धोकादायक वळणावर बसचे ब्रेक फेल झाल्याने  बस चालकाने प्रसंगावधान राखून बाजुकडील एका विजेच्या खांब्याला धडक दिली व नंतर बसने दोन कोलांटय़ा घेतल्या असे बस चालक दाऊद नदाफ याने इस्पितळात उपचारानंतर सांगातले.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशीः अफिना कार्दोझ (49), रुमानिया फर्नाडिस ( 78),  प्रिती डिसौझा (36), प्रेसिलवा कार्दोझ (36), सुनिता बार्रेटो (42), फॅड्रीक फर्नाडिस (46), सेवेरिना कार्दोझ (71), पेर्पेत फर्नाडिस (35), रोस्टन फर्नाडिस (40) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात आले आहे तर बस चालक दाऊद नदाफ, एलिझाबोथ फर्नाडिस, आश्विना फर्नाडिस व रोनन फर्नाडिस यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

अपघाताची खबर कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना खासगी वाहनांतून तसेच ऍम्बलुन्समधून काणकोणच्या आरोग्य केंद्रत नेले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

अपघाताची खबर कळताच आगोंदचे उपसरपंच आबेल बोर्जीस तसेच खोला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोला पंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार इजीदोर फर्नाडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमींची विचारपूस केली. 

खोला पारयेकट्टा येथील धोकादायक वळणावर संरक्षक भींत उभारण्यात यावी तसेच या धोकादायक वळणासंबंधी सुचना देणारे फलक उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मात्र या मागणीकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे. दोन वर्षापूर्वी याच वळणावर एक बस उलटून सहलीसाठी आलेले अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या जागी संरक्षक भींत बांधण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे.

Related posts: