|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शाळेत शिकवणाऱया शिक्षकांना जास्त मानधन मिळायला हवे

शाळेत शिकवणाऱया शिक्षकांना जास्त मानधन मिळायला हवे 

अंकिता गोसावी/ मडगाव

‘खुप वर्षांन पूर्वी मी कुठेतरी वाचले होते, रुसच्या लेखकाने म्हटले होते की, कुठल्याही समाजाला ज्ञान संपन्न व्हायचे असेल तर शाळेमध्ये शिकवणाऱया शिक्षकांचे अधिक सन्मान केले पाहिजे, माझ्या दृष्टीने महाविद्यालयात शिकवणाऱया शिक्षकांच्या तुलनेत शाळेत शिकवणाऱया शिक्षकांना जास्त मानधन मिळाले पाहिजे. कारण मुलांना शिकवणे व मोठय़ांना शिक्षण देणे यात खुप फरक आहे. त्या संस्थेमध्ये त्यांना तयार करणे, कल्पनाशिल बनवणे ही एक खुप मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते, असे उद्गार प्रमुख पाहुणे भोपाळ येथील प्रसिद्ध भारतीय बालसाहित्यिक उदयन वाजपेयी यांनी आपल्या बीजभाषण काढले.

  रवींद भवन मडगाव, एससीईआरटी, सर्व शिक्षा अभियान-पर्वरी व कोकणी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मडगाव रवींद्र भवन येथे पहिल्या बालसाहित्य परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एससीईआरटीचे व सर्व शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक नागराज होनौकरी, कोकणी भाषा मंडळचे अध्यक्ष चेतन आचार्य, उपाध्यक्ष रत्नमाला दिवकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष साईश पाणंदिकर व सदस्य सचिव पंढरीनाथ नाईक हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उदयन वाजपेयी हे हिंदी कवी, कथाकार, निबंधकार, पठकथा लेखक आहेत. यांच्या कविता तथा निबंध आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे साहित्य हे भारतीय तसेच इतर भाषांमधुन अनुवादित झाले आहे. गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ येथील ते फिझिओलॉजीचे ते प्राध्यापक आहेत. अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपले योगदान दिले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लहानपणी आपली आजी कथा सांगायची, राज्यातील प्रत्येक आजीने आपल्या नातीला व नातूला कथा सांगितल्या आहेत. तर त्या नक्की काय सांगायच्या तर मुलांना कल्पनेच्या आधारे गणराज्याचे नागरिक बनवत असते. हेच तर बालसाहित्य आहे. बालसाहित्याचे जर वेगळे स्थान निर्माण झाले असेल त्याचे फक्त एक मात्र कारण आहे, ते म्हणजे ही आजी नावाची जी संस्था आहे ती हळुहळू लुप्त होत गेली. बालसाहित्य म्हणजे कल्पनात्मक साहित्य आहे. बालसाहित्याचे अनेक प्रकारे विभाजन केले जाते. त्यामुळे मुलांचे असे स्वतंत्र साहित्य असे जे विभाजन केले आहे ते काही दिवसांपुरते असते, पण ते  आत्यंतिक असत नाही.

  चेतन आचार्य यांनी स्वागतपर भाषण केले. प्रशांत नाईक यांनी प्रास्तविक केले व विविध प्रंतातून आलेले बालसाहित्यिकांचा थोडक्यात परिचय करून दिला. नागराज होनौकरी यांनी आयोजक या नात्याने आपल्या भाषणात या संकल्पने विषयी हेतू स्पष्ट केला.

 दरम्यान 17 बालसाहित्य पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले होते. यात अन्वेषा सिंगबाळ, किरण म्हामरे, रत्नमाला दिवकर, चेतन आचार्य, हर्षा शेट्ये, जयंती नाईक, लिना काकोडकर, गीता नाईक, रजनी भेंब्रे या गोमंतकीय लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. तद्नंतर पहिल्या सत्राला सुरुवात करण्यात आली.

Related posts: