|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सिद्धनाथ स्पंदन’मध्ये 2 रोजी नामवंत कलाकारांच्या मैफली

सिद्धनाथ स्पंदन’मध्ये 2 रोजी नामवंत कलाकारांच्या मैफली 

वार्ताहर/ बोरी

मुद्रा प्रतिष्ठान, श्री नवदुर्गा देवस्थान बोरी आणि कला आणि संस्कृती संचालनालय,  यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी येथील सिद्धनाथ पर्वतावर शनिवार 2 डिसें. रोजी  ‘सिद्धनाथ स्पंदन 2017’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध बासरी वादक पं. रोणु मजुमदार, सितारवादक पं. योगराज नाईक व भरतनाटय़म नृत्यांगना दिव्या रक्यान लुनिया यांच्या मैफली होणार आहेत. कार्यक्रम सायं. 5.30 वा. सुरु होणार आहे.

पं. रोणु मजुमदार

जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. रोणू मजुमदार यांनी आपल्या बासुरी वादनाने जगभरातील युवा पिढीला आकर्षित केले आहे. त्यांनी आपले वडील डॉ. भानु मजुमदार यांच्याकडून बासुरी वादनाचे धडे घेतले. त्यानंतर स्व. पं. लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले, पं. विजय राघव राव व पं. रवी शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शिकण्याची संधी मिळाली. 5,378 बासुरी वादक असलेल्या एका खास कार्यक्रमाचे आयोजन पं. रोणु मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विश्व विक्रम म्हणून हा कार्यक्रम नोंद झाला.

पं. योगराज नाईक

पं. योगराज हे गोमंतकीय तरुण सितारवादक असून इटवा घराण्याचे उस्ताद शहीद परवेज यांच्याकडून त्यांनी सितारवादनाचे धडे घेतले. संगीत घराण्यात त्यांचा जन्म झाला असून त्यांच्या आजी पिरोजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाचे धडे घेतले. तर सितार वादनाचे शिक्षण उस्ताद करीम खान यांच्याकडून घेतले. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी विविध संगीत संमेलनात भाग घेण्यास सुरुवात केली. शास्त्रीय गायनात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश व महाराष्ट्रात गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.

दिव्या रक्यान लुनिया

लोककला व भरतनाटय़म नृत्य अशा दोन्ही नृत्यात त्या पारंगत आहेत. श्रीमती रेखा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोककलेचे शिक्षण घेतले. तर भरतनाटय़मचे शिक्षण मंजरी चंद्रशेखर राजेंद्रन व पद्मश्री लिला सॅमसन यांच्याकडून घेतले.

Related posts: