|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » लातूर- नांदेड महामार्गावर भीषण अपघात ; 7 ठार तर 13 जण गंभीर जखमी

लातूर- नांदेड महामार्गावर भीषण अपघात ; 7 ठार तर 13 जण गंभीर जखमी 

ऑनलाईन टीम / लातूर :

लातूर- नांदेड राज्य महामार्गावर पुझर व टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघाता 7 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास कोळपापाटीजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनूसार, प्रुझर जीप ही लातूर रोड हून लातूर येथे येत होती.यामध्ये मंगळवारी पहाटे लातूर रोड रेल्वे स्टेशनवर उतरलेले प्रवासी प्रवास करत होते.तर दुसरी प्रुझर जीप (क्रमांक एमएच 13 बीएन2454) ही पंढरपूरहून नांदेडच्या दिशेने जात होती.या क्रूझरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला आणि समोरून येणाऱया दुसऱया पूझरला धडक दिली.हा अपघात कोळपा पाटीजवळ घडला व या भीषण दुर्घटनेत 7 जाणांचा मृत्यू झाला आहे.

 

Related posts: