|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कांदळवनात पुन्हा 25 ते 30 ट्रक भराव

कांदळवनात पुन्हा 25 ते 30 ट्रक भराव 

नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ

सांयकाळी उशिरापर्यंत कोणतीही कारवाई नाही

संबंधितांकडून दाखवली जाताहेत एकमेकांकडे बोटे

प्रतिनिधी /रत्नागिरी

शहरातील झाडगाव येथील रत्नाqिगरी नगर परिषदेच्या लघुद्योग एमआयडीसी परिसराच्या बाजूला असलेल्या कांदळवन असेलेल्या जागेत शासकीय आदेशांची पायमल्ली करत पुन्हा सुमारे 25 ते 30 ट्रक खडी वाळूचा भराव टाकण्यात आला आहे. गेले अनेक दिवस हे काम सुरु आहे.

घटनास्थळी जागा विकासकांनी नगर परिषदेच्या आदेशांची तमा न बाळगता पुन्हा सुमारे 25 ते 30 ट्रक भराव अनधिकृतपणे टाकला असून पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणत हानी केली आहे. या बाबत नगर परिषदेकडून संबंधित विकासकांना या ठिकाणी भराव टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही हे विकासक एवढे निर्ढावलेले आहेत की शासकीय आदेशांची अक्षरशः पायमल्ली करत वारंवार भराव टाकण्याचे काम करत आहेत व पर्यावरणाला हानी पोहोचवली जात आहे.

यावेळी ‘तरूण भारत’च्या प्रतिनिधीनेही घटनास्थळी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगर परिषदेचे इंजिनिअर एन. पी. मांडेकर यांना या बाबत आपण सूचना करतो व संबंधित विकासकाविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावयास सांगतो. मात्र सायंकाळपर्यंत या बाबतची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली नव्हती.

अखेर ‘तरूण भारत’ प्रतिनिधीने रत्नागिरी नगर परिषदेचे इंजिनिअर एन. पी. मांडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मांडेकर यांनी सांगितले की, कायदेशीर बाबी तपासून याबाबत कारवाई केली जाईल, तसेच लवकरच पोलीस तक्रारही केली जाईल. तसेच याबाबतची अधिक माहिती आपणास मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद हे देतील आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. यानंतर ‘तरूण भारत’ने प्रतिनिधीने मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद माळी यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत आपण माहिती घेतो. कारवाई करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देतो, असे सांगितले.

कांदळवनाचा चेंडू इकडून-तिकडे जातोय टोलवला

एकूणच कांदळवनाचे नुकसान करून पर्यावरणाची हानी करणाऱया विकासकावर सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसून आल्या नाहीत. कांदळवनाचा चेंडू नगराध्यक्षांच्या टेबलवरून इंजिनिअर मांडेकर यांच्या टेबलवर व पुन्हा इंजिनिअर मांडेकर यांच्या टेबलावरून मुख्याधिकाऱयांच्या टेबलावर असा गोल-गोल फिरत होता. वारंवार कांदळवनाची हानी करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱयावर कारवाई न करण्यात कोणते राजकारण कि अर्थकारण आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Related posts: